पशुवैद्यक महाविद्यालय अकोला या ठिकाणी स्थापित झाल्याने नाशिक, जळगांव खान्देश अर्थात उत्तर महाराष्ट्रासाठी दुःखाची बाब

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या कक्षेत येणाऱ्या परिसरावर मोठा अन्याय

    भुसावळ प्रतिनिधी l

पशुवैद्यक महाविद्यालय अकोला या ठिकाणी स्थापित झाल्याने नाशिक, जळगांव खान्देश अर्थात उत्तर महाराष्ट्रासाठी दुःखद आणि नेतृत्वासाठी लाजिरवाणे. व अन्याय केला आहे….

जिल्ह्यात मोठ्या कष्ठाने मान्यता मिळालेले पशुवैद्यक महाविद्यालय इतरत्र देवून जिल्ह्यातील पशुधन, पशुपालक, विद्यार्थी आणि सर्वांगीण शेतिविकासाला ्मो्ठी चपराक दिली गेलीं आहे…..

आशिया खंडातील पहिले पशुवैद्यक महाविद्यालय परळ मुंबई या ठिकाणी 1886 मध्ये स्थापित करण्यात आले. त्यानंतर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ हे कोकण कृषी विद्यापीठ यांच्यासोबत जोडण्यात आले.त्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत

नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर 1958 साली स्थापन झाले.मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी ची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार होता परंतु ते नाकारून परभणी पासून हाकेच्या अंतरावर मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत उदगीर या ठिकाणी 1987 मध्ये पुन्हा एक पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाले.हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या कक्षेत येणाऱ्या परिसरावर मोठा अन्याय झाला.

त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत

पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ ची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. पण तरीही उत्तर महाराष्ट्रावर सतत अन्याय होत आला.त्यानंतर 2000 मध्ये महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली गेली आणि सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालये या अंतर्गत जोडली गेली.त्या काळात उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अक्षरशः झगडावे लागत होते. त्याचप्रमाणे शेतीशी निगडित पशुधन, पशुपालक, आणि विद्यार्थी यांची कुचंबणा होत गेली. पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात नसल्याने उत्तर महाराष्ट्राचे अतोनात नुकसान आजवर झालेले आहे याची दखल माझी मंत्री एकनाथ खडसे यांनी तात्काळ घेवून जिल्ह्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय मिळवून आणले…त्यासाठी कार्यवाही

सुद्धा सुरू झाली…परंतु दुर्दैवाने एकनाथराव खडसे पदावर न राहिल्याने त्यावर राजकारण सुरू झाले आणि पुन्हा उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय झाला….

महत्त्वाची बाब म्हणजे अकोला या ठिकाणी पदव्युत्तर पशुवैद्यकीय महिद्यालय आधीपासून आहेच. म्हणजे त्याचा लाभ परिसरातील पशुपालक, पशुधन, शेतकरी यांना सातत्याने मिळतच आहे….तरीही पुन्हा जळगांव जिल्ह्यात स्थापन झालेले पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला या ठिकाणी नेणे विचित्र आहे.आपल्या भागातील जनतेचा, पशुधनाचा, रोजगाराचा, शिक्षणाचा विकास न होऊ देणे ही दुःखद आणि शरमेची बाब आहे हे यावरून स्पष्ट होत आहे

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ चे माजी सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलिंद पाटील यांच्याशी चर्चा केली त्यांनी माहीती दिली