सद्दाम – संदीप दामोदर महाजन साप्ताहिक व पोर्टलचा खंडणीखोर बोगस पत्रकार – शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील

पाचोरा( प्रतिनिधी ) दि,७
पाचोरा भडगाव तालुका आणि संपूर्ण परिसरात
संदीप दामोदर महाजन अर्थात सद्दाम हा पत्रकार नावाने तोडपाणी बहाद्दर, ब्लॅकमेलर तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सर्व लोकप्रतिनिधी ,राजकीय पदाधिकारी,अधिकारी व व्यापारी वर्गाला सुपरिचित आहे.त्याचे विविध कारनामे समस्त मतदार संघातील जनतेला महित आहेतच. नुकतेच त्याने गोंडगाव ता.भडगाव येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांचे विषयी अशोभनीय शेरेबाजी केली आहे.तसेच समस्त महिला वर्गाला व पालक वर्गाला आपल्या मुलींबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून प्रसारित केला आहे. त्यामुळे अशा या खंडणीखोर व्यक्तीची माहिती उर्वरित सर्व जनतेला व्हावी म्हणून याचे लोकांच्या छळवणुकीचे, ब्लॅकमेलिंगचे किस्से आजच्या दिनांक ७ रोजी (सात)रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा कार्यालयाच्या सभागृहात चार वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिंदेगटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संदीप महाजन हा अशा पध्दतीने मुलाखत प्रसारीत करतो की,तो काही साधुसंत, महात्मा आहे. गेल्या २५ वर्षातले याचे धंदे (कारनामे) पाचोरा शहरवासीयांना ज्ञात आहेत.
गेल्या काही वर्षांपूर्वी याने बाहेरगावच्या शेती व्यवसायिकाला ब्लॅकमेल करून रेतीच्या धंद्यात पार्टनर झाला होता. याची बातमी तात्कालिन साईमत या वृत्तपत्राचे पत्रकार गणेश शिंदे या वार्ताहाराने ‘लेखणीचे शिलेदार रेतीचे भागीदार’ या मथळ्याखाली अनेक दिवस छापुन आणली होती.
• १० वर्षापुर्वी देशमुखवाडी येथे याने उघडपणे व अवैधपणे गॅस सिलेंडर ब्लॅक मार्केट मध्ये विकण्याचा काळा धंदा करून माया जमावली आहे.
• शहरात बेकायदेशीर पणे पत्यांचा क्लब, झन्ना मन्ना असे अनेक वर्ष बेकायदेशीर पणे राजरोसपणे धंदा पोलिसांच्या नाकावर टिचून पत्रकारितेच्या माध्यमातुन करत होता.
• गेल्या अनेक वर्षात अनेक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून आपला गोरखधंदा चालुच ठेवला आहे.
• नगरपालिकेतही हा आपल्या पत्रकारीतेच्या बळावर इतर ठेके घेतो व अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतो.
• न.पा.च्या स्टेशन रोडच्या संत कंवराम व्यापारी संकुलातील न.पा. चे गाळे बेकायदेशीर आहेत म्हणुन त्रास दिला व नंतर मोठी तोडीपाणी केली हे व्यापारी बांधव जाणतात.
• पी.टी.सी. संस्थेची भडगांव येथील संस्थेने लाखो रुपये खर्चुन केलेली इमारत याने तोडीपाणी करता आली नाही म्हणुन पाडायला लावली हे भडगांव वासीय जाणतात.
• नंतर ब्लॅकमेल करून बायकोला संस्थेत नोकरी लावली.
• मागच्या वर्षी दिलीप भाऊ वाघ माजी आमदार यांचा मुलगा नगरसेवक सनी वाघ यांच्या मुलाच्या नावे असलेला ठेका त्यालाही त्रास दिला आहे. हे पाचोरेकर जाणतात.
जुने शिवसैनिक तालुका प्रमुख अशोक मिसाळ यांना खोट्या व मानहानीकारक प्रकरणात अडकवून राजकारणातुन संपवले.
• नितीन तावडे जुने शिवसैनिक यांची व त्यांच्या कुटूबांची कारण नसतांना त्या काळात सतत
बदनामी ध्येय न्युजच्या माध्यमातुन केली.
• तात्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील यांची देखील बदनामी सतत वृत्तपत्राच्या माध्यमातून केली.
• माजी आमदार आर.ओ. तात्या यांच्या आदर्श कृषी केंद्रावर जावुन धुडगुस घालणे व खोट्या बातम्या छापून आणणे हे त्याकाळातील आपण सर्व जाणतात.
• पाचोरा पीपल्स बँक प्रकरणात माजी चेअरमन अशोक संघवी यांना ब्लॅकमेल करून प्रचंड त्रास दिला.
• याने एकही राजकीय पुढारी, व्यापारी, पत्रकार व सर्वसामान्यांना देखील सोडले नाही. मुंबई येथे वास्तव्यास असलेले पत्रकार अनिल महाजन यांना रेल्वेच्या खोट्या केसेस मध्ये अडकवुन अनेक दिवस तुरुंगात या महाशयाने ठेवले होते.
हल्लीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी अनेक वर्ष वाद करून कुटुंबाची बदनामी हे सर्व पाचोरावाशिय जाणतात.
• लोकमतचे शाम भाऊ सराफ यांनाही मारण्याची धमकी व केलेले वाद आजही आपण बघतो. त्याने केलेल्या सर्व केसेस ह्या बी समरी म्हणुन अधिकारी यांनी बी फायनल म्हणुन केलेल्या आहेत.
• २५ वर्षापुर्वी त्याकाळी पी. आय. अशोक करपे यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन जेल मध्ये टाकले होते.
२५ वर्षात अनेकदा तुरुंगात व अनेक गुन्हे ह्याच्यावर दाखल आहेत.
• २००२ मध्ये जेष्ठ समाजवादी नेते शरद आण्णा पाटील( ऍड अभय पाटील यांचे वडील)यांच्यावर देखील काहि एक कारण नसतांना खालच्या पातळीवर जावुन घाणेरडे लिखाण केले होते.
• सख्या बापाशी अनेकदा वाद त्याकाळी देशमुख वाडी भागातील रहिवाशी सांगतात या वादातच याने
विष पिऊन जिवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्ती असताना स्वतः केला होता.
• स्वता:च्या आईच्या अंत्ययात्रेच्या वेळी सख्या बहिणीशी प्रेत घरात असतांना सख्या भाच्याशी मारामारी व कोर्ट कचेऱ्या केल्या आहेत.
* स्वतः मेडिकलेम पॉलिसी काढून खोटे क्लेम करण्यासाठी डॉक्टर बाधवांना अनेक डॉक्टरांना ब्लॅकमेल केले आहे.
* अनेक पगारी शिक्षकांना सोबत घेऊन क्लासेस चालवून बेकायदेशीर पैसे कमविले
*डॉ नीलकंठ पाटील यांना देखील अनेक प्रकारे त्रास दिला आहे तसेच नीलकंठ पाटील नावाचे बेरोजगार शिक्षकावर देखील स्वतःच्या शिकवणी चालावी म्हणून खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला आहे.
* स्वतः घरात अवैधपणें शस्रे बाळगत असल्याचा फोटो मागे सर्वत्र प्रसारित झाला होता याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.