‘भगवा दहशतवाद हा खरा आहे’; स्वरा भास्करची आरएसएस, भाजपवर टीका

0

थिरूवनंतपुरम-केरळमधील शबरीमाला मंदिरात परंपरा मोडीत काढत महिलांनी प्रवेश केला. यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोधात हिंदुवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने केली. या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर चार गावठी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संघावर आणि भाजपवर टीका केली आहे. ‘पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. यांनासुद्धा फाशीची शिक्षा होणार का? भगवा दहशतवाद हा खरा आहे,’ अशा शब्दांत स्वराने आरएसएस आणि भाजपावर निशाणा साधला आहे.