मुंबई-संजय दत्त यांची भूमिका असलेला ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला आहे. चित्रपट फ्लॉप होईल असे दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृहांतून त्याच्यावर उतरणाची वेळ आली.
संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित संजय लीला भन्साळी यांचा ‘संजू’ या चित्रपटाने चांगली कमाई केली मात्र ज्या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे तोच चित्रपट फ्लॉप गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चित्रपट फ्लॉप गेल्याने दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया प्रचंड निराश झाले आहेत. केवळ निराश नाही तर ते खूप डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ही निराशा त्यांनी बोलून देखील दाखवली आहे.