संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात साजरा

मुक्ताईनगर प्रतिनिधि |

येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचा 726 वा अंतर्धान समाधी सोहळा वैशाख कृ. १० दि.14. 5 .2023 रोजी रविवारी संत नामदेव महाराज यांचे वंशज ह भ प केशव नामदास महाराज पंढरपूर यांच्या पुष्पवृष्टीच्या कीर्तनाने तसेच पंढरीश परमात्मा पांडुरंग पादुका पालखी सोहळा, संत निवृत्तीनाथ दादा, संत नामदेव महाराज, रुक्मिणी माता यांच्या पालखी पादुका सोहळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.


या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग परमात्मा पादुका पालखी सोहळा पंढरपूर ,संत नामदेव महाराज पादुका पालखी सोहळा पंढरपूर, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पादुका सोहळा त्रंबकेश्वर, रुक्मिणी माता पादुका पालखी सोहळा कौडीण्यपूर, अशा महत्त्वाच्या पादुका सोहळ्यांच्या आगमन झालेले होते या पादुका सोहळ्याचे तसेच आदिशक्ती मुक्ताई साहेबांचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले
यावेळी संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲड रवींद्र पाटील यांच्या हस्ते मुक्ताई साहेबांची महाआरती करण्यात आली, प्रसंगी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विकास ढगे, अभय टिळक, संत निवृत्तीनाथ संस्थानचे निलेश गाढवे पाटील, विश्वस्त तथा पुजारी जयंत महाराज गोसावी , संत सोपान काका संस्थानचे त्रिभुवन महाराज गोसावी, पांडुरंग परमात्मा पादुका पालखी सोहळ्याचे मेघराज वळखे, अमोल पाटील , सुर्यकांत भिसे, रुख्मिणी माता संस्थानचे सर्जेराव देशमुख, संत नामदेव महाराज संस्थानचे तथा संत नामदेव महाराज वंशज केशवदास नामदास महाराज(अप्पा) व इतर विश्वस्त तसेच संत गजानन महाराज संस्थानचे कौस्तुभ निळकंठराव पाटील देहुकर फड बिभीषण महजराज , आडे फाटा कुऱ्हाडे पाटील आदींसह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती