पुणे – बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या पुण्यातील फॅन्ससाठी ‘द-बँग द टूर’ हा रंगारंग कार्यक्रम घेऊन येत आहे. फोर पिलर एंटरटेंमेंट, 18 डिग्री आणि निर्माण ग्रुप यांनी आयोजित केलेल्या द-बँग द टूरचा हा तरुणाईसाठी नक्कीच थ्रिलर राहणार आहे. जवळ जवळ 2 दशकांनंतर पुणे अश्याप्रकारे सिने कलाकारांना आणि फूल ऑन बॉलीवूडचा जलवा अनुभवणार आहे. ज्यात कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, डेझी शहा, गुरू रंधवा आाणि मनीष पॉल हे सलमान खानसोबत त्यांच्या सुपर परफोर्मन्सनी पुणेकरांची मने जिकतील. 24 मार्चला होणार्या या प्रोग्रॅमची सर्व तयारी सध्या म्हाळुंगे, बालेवाडीमध्ये जोरात सुरु आहे.
पुणेकरांना मनोरंजनाची पर्वणी
सोहेल खान एन्टरटेनमेन्ट आणि जे. ए. इव्हेंट्सचे दिग्दर्शन आणि पटकथा असलेला हा कार्यक्रम मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. यासाठी प्रोड्कशनची सर्व टीम दिवस रात्र एक करून स्टेज, 30 हजार प्रेक्षक येऊन पाहू शकतील यासाठीची जागा यासाठी काम करत आहेत. मुख्य कार्क्रमाच्यावेळी सर्व काम सुरळित पार पाडण्यासाठी येथे 200 अंगरक्षकही ठेवण्यात येणार आहेत. जे शेरा म्हणजेच गुरमीत सिंगच्या टायगर सिक्युरिटीज बॉडीगार्डस् असतील. तगडी स्टारकास्ट प्रमाणेच प्रोड्क्शनचे लोक या जागेचा कधी न पाहिलेला असा अनुभव पुणेकरांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. जेणेकरून हा पुणेकरांसाठी पैसा वसूल अनुभव राहिलं. याबद्दल बोलताना फोर पिलर्सचे डारेक्टर समीर पवानी सांगतात की, ज्या दिवशी आम्ही ही सलमानची टूर जाहीर केली आहे, त्या दिवसापासून आमचे फोनस् सतत वाजतच आहेत. या प्रोग्रॅबद्दल फक्त पुण्यात लोक विचारत नाहीयेत तर आम्हाला कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, अश्या जवळपासच्या मुख्य शहरांमधून पण प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. आमच्या टीमच्या उत्साहाला तर सीमाच नाहियेत. कारण ही टूर हे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे आम्ही रोज नवीन उत्साहानी यासाठी काम करत आहोत.
रसिकांसाठी कॅश ऑन डिलीव्हरी
द-बँग द टूर ही देशाची राजधानी नवी दिल्ली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि हाँगकाँग येथे ही खूप मोठ्या प्रमाणात हिट झाली आहे. मात्र आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे या सर्वात मोठा आणि एंटरटेनिंग बॉलीवूड प्रोग्रॅम पाहण्यासाठी सज्ज झाले आहे. 24 मार्चरोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सायंकाळी साडेसहा वाजता असून, गेटस् दुपारी 2.30 पासून उघडतील. पुण्यातल्या फॅन्ससाठी कॅश ऑन डिलीव्हरी हा ऑप्शनदेखील देण्यात आलेला आहे. त्यासाठी तिकीटस खालील नंबरवर बुक करू शकता : 020 – 69788000 किंवा 9763651573.