नवी दिल्ली: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाने मोदी लाट होती, तीच लाट २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली, असे विधान कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवले. लोकसभेच्या निवडणुकीत कुठेही मोदी लाठ दिसून येणार नाही असे विरोधी पक्ष आपल्या प्रचार सभेत सांगत होते. मोदी यांच्या लोकप्रीयतेमध्ये सगळे वाहून गेले असून आम्ही जिवंत आहोत हेच आमचे नशीब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निकालानंतर आज पहिल्यांदा सलमान खुर्शीद यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी लाटेची स्तुनामी आल्याचे मान्य केले आहे. खुर्शीद यांचा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना ५५ हजार मते मिळाली आहेत. त्यांनी याबद्दल मतदारांचे आभार मानले. तसेच राहुल यांनी आपला राजीनामा मागे घेवून अध्यक्ष पद सांभाळावे असेही त्यांनी म्हटले आहे.