डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संवेदनशीलेतेला सलाम…काय अफाट माणूस आहे हा…!
आदिवासी बालकांची सातपुड्याहून उंच झेप…!
धडगाव, जि. नंदुरबार, विशेष प्रतिनिधी –
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने…
दरीडोंगर हिरवी राने
जा ओलांडून या सरिता – सागरा…
आदिवासी बालकांना आकाशी झेप घेण्याची ओढ निर्माण करण्याचा संदेश जणू खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कृतीतून दिला..!
तर त्याचे झाले असे की, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून एक उत्तम संवाद मेळावा सातपुडा पर्वत रांगेतील तापी आणि नर्मदेच्या खोऱ्यांच्या मध्ये असणाऱ्या धडगाव ( जि. नंदुरबार) येथे पार पडला..
या मेळाव्यात रखडलेली जवळपास सगळी कामे त्यांनी मार्गी लावली. काही दिवसांपासून अडकलेला ८ कोटींचा नगरपंचायतचा निधी देखील काही तासात मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांनी शासन निर्णयासह देऊनही टाकला..
ही त्यांची कामातली तत्परता एकीकडे; तर दुसरीकडे त्यांनी देशाचं भविष्य असणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील चमक ओळखत त्यांची उंच झेप घेण्याची सुप्त इच्छा देखील पूर्ण केली..! धडगाव हे दुर्गम गाव, इथे हेलिकॉप्टर किंवा विमान हे डोक्यावरून जातानाच दिसते तेही क्वचित.. मग आता हेलिकॉप्टर गावात येणार म्हणून ते पाहायला काही आबाल वृद्ध – तरुण तर आलेलेच पण त्याहून जास्त मोठ्या प्रमाणावर आले होते ते म्हणजे शाळकरी मुले..
हेलिकॉप्टर पाहून आपण त्यातून आपला सुंदर गाव पहावा, आकाशात उंच पक्षांसारखे उडावे, घिरट्या घालाव्यात असे त्यांना वाटले असणारच.. ते त्यांच्या डोळांमधील स्वप्न टिपले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी..! आणि मग काय घडली ही ऐतिहासिक हेलिकॉप्टर राईड..! हो ऐतिहासिक..! डोंगर दर्यात राबणाऱ्या कष्टकरी सामान्यांच्या मुलांच्या स्वप्नाना पंख देणारी..! उंच भरारी नभात..!