बिजापूर : समाजवादी पार्टीचे नेते संतोष पूनम यांची छत्तीगढमधील बिजापूर येथे माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. संतोष पूनम हे मारिमाल्ला येथील रहिवासी होते. शिवाय ते ठेकेदारही होते. मंगळवारी रात्री मारिमाल्ला गावात काम सुरू असलेल्या ठिकाणाहून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. संतोष यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणुक समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणुन बिजापूर मतदार संघातून लढवली होती. याशिवाय ते बस्तरच्या बिजापूर जिल्ह्याचे समाजवादी पार्टीचे उपाध्यक्ष देखील होते.