रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत सावदा शहर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले संपर्क से समर्थन अभियानाचा
भुसावळ प्रतिनिधी दि 28 देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा तर्फे संपर्क से समर्थनज्ञअभियानाची रावेर लोकसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर विधानसभा अंतर्गत सावदा शहर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्क से समर्थन अभियान राबविण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख अशोक कांडेलकर व प्रमुख भाजपा पदाधिकारी यांनी सावदा शहरातील व्यापारी बाबू शेठ.राहुल भास्कर शिंदे यांच्या श्लोक अॅग्रा एजन्सी येथे तसेच शहरांतर्गत दुकानांना प्रत्यक्ष भेट देऊन मोदी सरकार मार्फत जनसामान्यपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यात आला व माहिती पत्रक वाटप करण्यात आले, तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन, मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. तसेच मोबाईल क्र.९०९०९०२०२४ वर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आव्हाहन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख अशोक कांडेलकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी सभापती जितेंद्र पाटील, रावेर लोकसभा संयोजक सुनील पाटील, रावेर तालुका सरचिटणीस महेश चौधरी, मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, माजी प.स.सदस्य राजेंद्र सावळे, सावदा शहराध्यक्ष जे.के.भारंबे, गोपाळ नेमाडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे, मनोज श्रावक, भास्कर सरोदे, भूषण महाजन, रितेश पाटील, प्रतीक भारंबे ई. प्रमुख उपस्थित होते.