समृध्दी देशमुख राजेश्वर कॉन्व्हेन्ट मधून प्राविण्याने प्रथम

अकोला —-स्थानिक डाबकी रोडवरील सामाजिक कार्यकर्ते,देशमुख जागृती मंडळाचे सदस्य श्री.अनिल देशमुख, वानखेडे यांची कन्या समृध्दी हिने १० वी च्या परीक्षेमध्ये ९८.४० टक्के गुण मिळवून रेणूका नगरमधील राजेश्वर कॉन्व्हेन्ट मधून प्राविण्याने प्रथम क्रमांकात उत्तिर्ण होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे.

 

समृध्दी ही प्रथमपासूनच राजेश्वर कॉन्व्हेन्टची एक अभ्यासू विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती.तिने सर्वच विषयांमध्ये ९५ ते ९७ असे गुण प्राप्त केलेले आहेत.सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांकाचे यश मिळवल्याबध्दल तिचे शाळा व्यवस्थापन,मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन होऊन सन्मान करण्यात आला.ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरूजणांना देते.प्राप्त यशाबद्दल समृध्दीनचे अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख महिला मंडळ व देशमुख समाज जागृती मंडळ व स्नेहीजणांकडून अभिनंदन करण्यात येऊन भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.