आज सॅमसंगच्या महागड्या स्मार्टफोनची लाँचिंग !

0

नवी दिल्ली: सॅमसंग आज भारतात Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ हे दोन नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे दोन्ही फोन न्यूयॉर्कमध्ये सादर केले होते. हे फोन गेले काही दिवस प्री-ऑर्डरसाठीही उपलब्ध करण्यात आले आहेत. फोनची विक्री २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून बेंगळुरूस्थित सॅमसंग ओपेरा हाऊसमध्ये हा लाँच कार्यक्रम होणार आहे.

फोनची प्री-बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ती २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सॅमसंग बेवसाइटसह ग्राहक फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि टाटा क्लिकवर हे फोन प्री-बुक करू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी नोट १० ची भारतातली किंमत ६९,९९९ रुपये आहे . भारतात गॅलेक्सी नोट १० केवळ ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमतेचा असेल. गॅलेक्सी नोट १०+ ची किंतमत ७९,९९९ रुपेय असून तो १०+१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असेल. हाच फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह ८९,९९९ रुपयांना असेल. कंपनी प्री-बुकिंगवर आकर्षक ऑफरदेखील देणार आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी ६ हजार रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे.