भुसावळ – येथील वांजोळा रोड वरील आपले सार्वजनिक वाचनालय – साने गुरूजी जन्म शताब्दी वर्ष 1998 मध्ये स्थापन झाले असून 2023 हे वाचनालयाचे ” *रौप्य महोत्सवी ‘वर्ष* आहे. त्या प्रीत्यर्थ लवकरच *” रौप्य महोत्सवी सन्मान सोहळा” -* मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे.
आज 11 जून ” साने गुरुजींचा स्मृती दिन” या निमित्ताने वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद सरोदे, कार्याध्यक्ष- श्रीकांत पाटील व समन्वयक- शांताराम पाटील व संचालक मंडळाने ” साने गुरूजी स्मृती गौरव पुरस्कार ” प्रतिनिधिक स्वरूपात जाहीर केले.
गेल्या 32 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचेकार्यकरणारे भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नारायण शिंदे यांना मुख्याध्यापक गौरव परस्कार .