जळगाव – धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील रहिवासी असलेले माजी आ. स्व. मुरलीधर पवार यांचे नातू तथा जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांचे चिरंजीव संग्रामराजे पवार यांनी वयाच्या २१व्या वर्षातच सिव्हील बी.टेक अभियांत्रिकीच्या अंतीम वर्षात ९२ टक्के गुण मिळवुन नेत्रदिपक यश मिळविले आहे. संग्रामराजे पवार याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.