नवी दिल्ली-भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांना पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. सानिया मिर्झाने आज पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना ट्वीटरद्वारे दिली. शोएबने आज सकाळी साडेसात वाजता ट्विटरवर कळवताना अतिशय आनंद होतोय, मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार, असे शोएबने म्हटले आहे.
Excited to announce: Its a boy, and my girl is doing great and keeping strong as usual #Alhumdulilah. Thank you for the wishes and Duas, we are humbled ???????? #BabyMirzaMalik ????????
— Shoaib Malik ???????? (@realshoaibmalik) October 30, 2018
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने, आपल्या मुलाचे नाव मिर्झा मलिक असे ठेवणार असल्याचे सांगितले होते. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझे मुल भविष्यात ओळखले जावे अशी माझी इच्छा असल्याचे सानियाने म्हटले होते.
२००४ साली सानिया मिर्झाला अर्जुन तर २००६ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.