हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्याने संजय राऊतांच्या अडचणींत वाढ

सत्तासंघर्ष शिंदे गटाचे आ. शिरसाट यांनी विधानसभेत केला प्रस्ताव दाखल

मुंबई l

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विविध विधानं केली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली आहे.. याबाबतचं पत्रही शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले, ११ तारखेनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमातून आणि ‘सामना’ वृत्तपत्रातून अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘हे’ सरकारचं वैध नाही, त्यांचे आदेश मानू नका’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. विधानसभा अध्यक्ष आमच्याकडेच वकिली करत होते. त्यांना यातलं काहीही कळत नाही. त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी अनेक वक्तव्य केली. या वक्तव्यांमुळे हक्कभंग झाला आहे, असं मला वाटतं.

नेमकं काय म्हटलं पत्रात ? 

महोदय, गेल्या काही दिवसांपासून आहेत. उद्धव ठाकरे नटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करत असून आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करत आहेत.

भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्षांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा