मुंबई-देशभरात ‘अमूल’ ही दुधापासून विविध पदार्थ बनविणारी कंपनी प्रसिद्ध आहे. आपल्या कंपनीच्या ब्रांडिंगसाठी अमूल खूप युक्ती लढवते. दरम्यान आता ‘अमूल’ने वेगळीच ब्रांडिंग केली आहे. सध्या सर्वत्र ‘संजू’चित्रपटाचा गवगवा सुरु आहे. ‘संजू’च्या यशाचे सेलेब्रेशन अमूलने अनोख्य पद्धतीने केले आहे. ‘संजू’चित्रपटाच्या पोस्टरचा ‘फनी’ कार्टून तयार करून यशाचे सेलेब्रेशन केले आहे. संजू चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे वेगवेगळे फोटो ‘फनी’ पद्धतीने मांडले आहे.
संजू चित्रपटाने ५ दिवसात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. कमाईच्या बाबतीत संजूने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे.