मुंबई-अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’ हा बयोपिक बॉक्स ऑफिसवर धमाल करीत आहे. ‘संजू’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील बॉक्स ऑफिसवरही विक्रमी ठरले आहे. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये संजूने बाहुबली 2, डांगल, पीके, सुल्तान, टायगर जिंदा आणि इतर सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. तीन दिवसात १२० कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
रणबीर कपूरच्या कारकिर्दीत सर्वात दर्जेदार असा हा चित्रपट ठरला आहे. ऑस्ट्रेलियात विक्रमी कमाई केली आहे.