‘संजू’चं पहिलं ‘बढीया’ गाणं प्रसिद्ध

0

मुंबई-राजकुमार हिरानी दिग्दर्शित रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध झाले आहे. ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील एक मजेदार गाणं देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘बढीया, बढीया, बढीया’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता रणबीर कपूर व सोनम कपूर या दोघांनी या गाण्यात धमाल मजा केली आहे. या चित्रपटातील हे पहिलच गाणं आहे. हे  गीत सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायलेले आहे. रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांनी हे गाणं तयार केले आहे.

चित्रपटातील कथे प्रमाणे संजू अर्थात रणबीर कपूर आपल्या वडिलाला परेश रावल यांना गाणं लिहून आव्हान देत आहे. परेश रावल यांची समज आहे की संजू गाणं करू शकत नाही त्याला संजूने आव्हान दिले आहे.