मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील सरपंच व राजुरा येथील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र… जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने कारवाई
मुक्ताईनगर प्रतिनिधी:…..
तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका जानेवारी 2021 मध्ये पार पडल्या होत्या .निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आल्यानंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने तालुक्यातील हरताळे येथील सरपंच व तालुक्यातील राजुरा येथील तीन ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केलेले आहे.
विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने हरताळे येथील सरपंच प्रकाश संतोष कोळी यांना अपात्र केले आहे. प्रभारी सरपंच पदाचा पदभार उपसरपंच नामदेव भड यांच्याकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी महेश दयाराम शेळके यांनी सरपंच प्रकाश कोळी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत हरकत घेतली होती.
प्रकाश कोळी यांनी निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून विहीत मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी ८ जून रोजी निर्णय दिला होता सरपंच प्रकाश कोळी यांना अपात्र केले. उपसरपंच नामदेव भड यांच्याकडे
पदभार देण्यात आलेला आहे.
तसेच तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायत सदस्य पुष्पा अशोक भोलानकर , नर्मदा योगेश कांडेलकर, अशोक शालिग्राम भोलानकर यांनी जानेवारी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती ( एसटी ) राखीव जागेवर सदस्य म्हणून निवडून आलेले होते. निवडून आल्यानंतर मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10 (१ अ) नुसार सदस्य पदी राहण्यास अपात्र घोषित केलेले आहे. याविषयी संजय संतोष कांडेलकर राहणार राजुरा तालुका मुक्ताईनगर यांनी हरकत घेतली होती.