राजुरा येथील सरपंचा सह दोन सदस्य अपात्र 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जात वैधता प्रमाण पत्र वेळेत सादर न केल्याने झाले अपात्र :

मुक्ताईनगर प्रतिनिधी l

मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचयत सरपंचा सह दोन सद्स्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने झाले अपात्र

२०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचयत सार्वत्रिक निवडणुकीत राजुरा येथील सरपंच सौ पुष्पा अशोक भोलांनकर सौ नर्मदा योगेश कांडेलकर,अशोक शालिग्राम भोलानकर सर्व रा राजुरा सरपंच दोन सदस्य अनुसुचित जमाती ( ST ) च्या राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आले होते मात्र जातवैधात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांच्या विरोधात संजय संतोष कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे दि.१६ फेब्रु रोजी अर्ज केला होता

जिल्हाधिकारी कार्यलयात अर्जदार व सामनेवाले या दोघांना तारखांवर नॉलवूं सुनावणी केली असता दि २ में रोजी हे प्रकरण निकाला साठी ठेवण्यात आले होते आरक्षित जागेवर निवडुन आल्यानंतर बारामहिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असल्यावरही केले नाही तरीही त्यांना मुदतवाढ देऊनही सादर न केल्याने सौ पुष्पा अशोक भोलानकर,नर्मदा योगेश कांडेलकर, अशोक शालीग्राम भोलांनकर राजुरा अश्या तीन ग्रामपंचयत सरपंच सह सदस्य अपात्र करण्यात आले आहे.