सर्वधर्म समभावाचे दर्शन: ‘सर्वधर्म पूजा’ करून राफेल हवाई दलात दाखल

0

अंबाला: सीमारेषेवर चीनच्या कुरापती वाढल्याने तणाव वाढला आहे. त्यातच भारताच्या संरक्षण क्षेत्रात ताकत वाढविणाऱ्या राफेलचे संरक्षण दलात आगमन झाले आहे. आज गुरुवारी १० सप्टेंबर रोजी औपचारिकरित्या राफेलचे हवाई दलात समावेश झाले आहे. अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला. राफेलच्या समावेशासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंबाला येथे ‘सर्व धर्म पूजा’ करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई या सर्वधर्मियांनी यावेळी पूजा केली. भारतीयांच्या एकात्मतेचा संदेश यातून देण्यात आला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी यावेळी हजेरी लावली.

‘राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश होता.