सातोड ता. मुक्ताईनगर शिवारातील मुक्ताईनगर ते बोदवड जाणा-या रोडलगत गुढ खुनाचा 72 तासात उघड करुन 2 आरोपी जेरबंद पोलीसांची कामगिरी
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
दिनांक 6/06/2023 रोजी सकाळी 08.00 वाजता ” सातोड ता. मुक्ताईनगर शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे रोडचे नाल्यात अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाचा इसम संशयीत रित्या पडलेला आहे अशी माहिती मिळाली “. त्यावरुन सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. अपर पोलीस श्री. राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर भाग मुक्ताईनगर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना दिली. लागलीच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला येवून पोलीस स्टापसह घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळ हे सातोड ता. मुक्ताईनगर शिवारातील सिताराम लहानु बिचकुले रा. सातोड यांचे शेत गट नंबर 127 चे समोर मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे सिमेंट रोडच्या डाव्या बाजूचे नाल्यात एक अनोळखी इसमाचे प्रेत त्याचे डोके रक्ताने माखलेल्या स्थितीत पडलेला मिळुन आला. त्यावरुन सदर अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवे ठार केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन स्थानिक पोलीस स्टेशन व स्थागुशा जळगांव येथील स्वतंत्र पथक तयार करुन प्रथम अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे दृष्ट्रीने प्रयत्न सुरु केले. अनोळखी इसमाबाबत माहिती घेत असतांना. सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. पळे यांनी पोलीस स्टेशनला मिसींग नंबर 24/2023 अन्वये दाखल असून मिसींग व्यक्तीचे नाव रविंद्र मधुकर पाटील, वय-46, रा. चिनावल ता. रावेर असे असून त्याचे उजव्या हातावर रोशनी नाव गोंदले असल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही मिसींग व्यक्तीचे नातेवाईकांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे पाठविण्याबाबत सांगितले. तेव्हा मयताची पत्नी . नम्रता रविंद्र पाटील व भाऊ योगेश मधुकर पाटील हे समक्ष पोलीस स्टेशनला हजर होवून मयताचे प्रेत पाहून मयत हा रविंद्र पाटील असल्याचे खात्री करुन सांगितले. त्यावरुन योगेश मधुकर पाटील यांचे फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग-5 CCTNS NO. 200/2023 भादवि कलम 302, 201 प्रमाणे दाखल करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक रवाना केले देव गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेत होतो.
दिनांक 8/06/2023 रोजी दुपारी अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना. गुन्ह्यातील अज्ञात मयत यास दिनांक 4/06/2023 रोजी मुक्ताईनगर शहरातील संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचे सोबत एकत्र पाहिल्याची माहिती मिळाली. त्यावरुन राहुल काकडे व योगेश काकडे यांची माहिती घेतली असता ते गावात मिळून आले नाही. दिनांक 9/06/2023 रोजी पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व कर्मचारी संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचा शोध घेत असतांना ते मिळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले व विश्वासात घेवून विचारपुस केली असता. रविंद्र पाटील यांच्याकडे 15000/- रुपये रोख असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे रोडने एक किमी अंतरावर नेवून त्याचे जवळील पैसे, मोबाईल व इतर वस्तु काढून त्यास दगडाने जबर मारहाण करुन जिवे ठार केले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी 1) राहुल संतोष काकडे, वय- 25, रा. रेणुकानगर रेणुकामाता मंदीराचे पाठीमागे मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर, 2) योगेश गजानन काकडे, वय- 19. रा. जुनेगांव जुनी उर्दु शाळे जवळ मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर यांना अटक केली असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.
या खुनाच्या गुन्ह्याचे तपासात एम. राजकुमार , पोलीस अधीक्षक, जळगांव, . रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक जळगांव, . राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर उपविभाग मुक्ताईनगर, किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी केलेले मार्गदर्श व सुचना प्रमाणे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे . संदीप दुनगहू, सहायक पोलीस निरीक्षक, संदीप चेढे, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ शैलेश चव्हाण, पोना संतोष नागरे, पोना कांतिलाल केदारे, पोना नितीन चौधरी, पोना देवसिंग तायडे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना विजय पढार, पोना संजय पवार, पोना संदीप खंडारे, पोना विनोद सोनवणे, पोना सुरेश पाटील, पोकॉ रविंद्र मेढे, पोकॉ रविंद्र धनगर, पोकॉ मुकेश महाजन, पोकॉ अमोल जाधव, पोकॉ अंकुश बाविस्कर, पोकों विजय कचरे, पोका सचिन जाधव, पोकों प्रशांत चौधरी, परीविक्षा dysp कुलकर्णी ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ दिपक पाटील, पोना किरण धनगर, पोना ईश्वर पाटील यांचा समावेश होता.