बीसीसीआय दादांचा हातात; अध्यक्षपदी सौरभ गांगुली

0

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (दादा) याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर निवड झाली आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्यातुलनेत गांगुलीला अधिक पसंती मिळाली. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांची सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे. आसामच्या देबाजीत सैकिया यांची संयुक्त सचिवपदी निवड होण्याचीही शक्यता आहे.

अरुण धुमाळ हे केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत.