भूमाफियाच्या भीतीने अभिनेते दिलीप कुमार यांचे कुटुंबीय त्रस्त; मोदींना केले ट्वीट

1

मुंबई-प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे कुटुंबीय सध्या एका बिल्डरच्या भीतीने त्रस्त आहे. त्यांच्या बांद्रा येथील बंगल्यावर एका बिल्डरने मालिकाच दावा केला आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सायरा बानो खान यांनी मोदींना विनंती करत सांगितले आहे की भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून बाहेर आले असून ते आमच्या बंगल्यावर मालकी दावा करत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र तरीही भूमाफिया त्रास देत असून आम्हाला न्याय द्यावे अशी मागणी केली आहे.