शाळा पूर्वतयारी अभियान केंद्र स्तरीय प्रशिक्षण संपन्न

भुसावळ l शाळा पूर्वतयारी अभियान केंद्र स्तरीय प्रशिक्षण भुसावल तालुक्यात 6 केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. सदर अभियानाचा उद्देश्य हा शाळेत प्रविष्ट होणाऱ्या बालकाचें शिक्षक, पालक, स्वयंसेवक अंगणवाडी सेविका या सर्वांच्या मदतीने पूर्वतयारी करणे.

शंभर टक्के पट नोंदणी करणे. व पहिलीच्या वर्गात बालकाचे सहज संक्रमण घडवून आणणे हा होता.

इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या बालकांसाठी शाळा स्तरावरील मेळावा हा २८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे.सदर मेळाव्यामध्ये सात प्रकारच्या स्टॉलची मांडणी केलेली होती.  या प्रशिक्षणाला भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री किशोर वायकोळे साहेब यांनी कुऱ्हा व तळवेल येथे केंद्रस्तरीय कार्यशाळेला भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व शाळा स्तरावरील मेळावा घेण्यासाठी प्रेरित केले.

प्रशिक्षणास शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी, कुर्हे केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी ,उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख आशिक हुसेन , अंगणवाडी पर्यवेक्षिका जाधव मॅडम ,नवीद खाटीक, रमेश दांगोडे उपस्थित होते तसेच कुर्हे व

आचेंगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.