मराठमोळ्या शास्त्रज्ञ प्रा.अभय अष्टेकर यांना आइन्स्टाइन पुरस्कार

0

मुंबई- गुरुत्वाकर्षण विज्ञानात चार दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीने ही घोषणा केली आहे.

अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना १० हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती.

पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक असलेले अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात येत आहे.