बर्न: पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळालेल्या निरव मोदीला भारतीय तपास यंत्रणेने मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड मध्ये निरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदी यांची चार बँक खाती गोठवली आहे. या गोठवलेल्या खात्यात २८३.१६ कोटी रुपये आहेत.
भारताच्या मागणीनंतर हि बँक खाती गोठवण्यात आली आहे असे स्विस बँकेने निवेदन काढत म्हटले आहे.बाह्र्तीय तपास यंत्रणाना हे दुसरे मोठे यश मिळाले आहे. या अगोदर घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी च्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चोक्सीचं नागरिकत्व रद्द करीत आहोत,असे अँटिगुआच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मेहुल चोक्सी, निरव मोदी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करत भारताबाहेर पसार झाले आहेत. सीबीआय, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मोदी व चोक्सीची ४ हजार ७६५ कोटींची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोदीची पत्नी अमी हिच्याविरुद्धही अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे.