तऱ्हाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा दुसरा संपन्न

शहादा :तालुक्यातील तऱ्हाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा दुसरा संपन्न झाला. या मेळाव्यात सेल्फी पॉइंटचा मुलांनी व पालकांनी आनंद घेतला .

शहादा तालुक्यातील तऱ्हाडी येथील जि प शाळेत येथे इयत्ता पहिलीत दाखल मुलांचा शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन वरिष्ठ कार्यालय व डायट नंदुरबार यांच्या परिपत्रकान्वये आयोजित करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक गावाचे सरपंच धनराजभाऊ ठाकरे, व प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश ठाकरे , समिती सदस्य ग्रामस्थ पालक विद्यार्थी उपस्थित होते.

या मेळाव्यात विदयार्थ्यांच्या विविध क्षमता तपासून पाहण्यासाठी आणि अध्ययन पातळी जाणून घेण्यासाठी वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या 7 टेबलांवर साहित्य मांडणी करणयात आले . यात नाव नोंदणी, बौद्धिक विकास, भाषिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, गणन पूर्व तयारी, लेखन वाचन पूर्व तयारी साहित्य वाटप अभिप्राय नोंदणी आदी प्रकारचे टेबलावर क्रमवार पालक व मुलाला साहित्याच्या आधारे वैविध्य वेगवेगळ्या कृती करून मुलांना मुक्तपणे खेळण्याचा व साहित्य हाताळण्याचा आनंद मिळवला. तर सेल्फी पॉइंटवर मुलांनी व पालकांनी मोबाईलद्वारे सेल्फी फोटो काढून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी मुख्यध्यपाक शांतीलाल अहिरे यांनी पालकांना आपल्या लहानश्या मुलांच्या कलागुणांना कसा वाव द्यावा आणि आपल्या घरातील वेगवेगळ्या साधन समुग्रीच्या साहित्याच्या आधारे पालकांसोबत कसे शिकू शकते आणि आपण कसे शिक्षण देणार याबाबत मार्गदर्शन केले.

 

मेळाव्यातील विविध टेबलांवर माहिती देण्यासाठी व नावनोंदणी कामी शिक्षक अंबादास कऱ्हाळे, अंगणवाडी शिक्षिका रेखाताई निकुंभे, वैशालीताई कापडी, शारदा वाळवी यांनी व अंगणवाडी सेविका पाटील रोहिणी, प्रमिला ईशी, छोटीबाई ठाकरे आदिंनी व इयत्ता तिसरी व चौथी च्या मुलांच्या मदतीने नवीन पहिली त दाखल मुलांकडून वेगवेगळ्या कृती करून घेऊन विकास पत्र कार्ड भरून नोंदी घेतल्या. प्रसंगी सर्व पहिलीत दाखल असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास पुस्तिका व युवकमित्र परिवार या सामाजिक संस्थेमार्फत मोफत मिळालेल्या सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकाचेही वाटप करण्यात आले. मुलांनी दिवसभर मुक्तपणे खेळून साहित्य हाताळणी करत आंनद व्यक्त कॆला. मुलांसाठी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने विशेष भोजनात चिकन करी, मसाले भात व्यवस्था करण्यात आली विद्यर्थ्यांनी भोजनाचा देखील छान आस्वाद घेलता. यामुळे सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शिक्षकांचे कौतुक केले. मेळावा आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि अंगणवाडी शिक्षिका व समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपास्थितांचे आभार शिक्षक आंबादास कऱ्हाळे सर यांनी मानले.