अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे, सरकार काही तरी लपवते आहे-चिदंबरम

0

नवी दिल्ली-केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील वाद वाढत आहे. यावरूनच गवर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे. भारतीय रिझेर्व्ह बँकेत अनुच्छेद ७ लागू करण्यात आले आहे, यावरून दिसून येते कि अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर असून सरकार काही तरी लपवते असल्याचे सांगितले आहे. ट्वीटरद्वारे त्यांनी हे भाष्य केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिनियमानुसार अनुच्छेद ७ लागू केल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.