पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत आयएमआरच्या नीरज जोशीची निवड

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत आयएमआरच्या बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी नीरज चंद्रशेखर जोशी यांचे निवड करण्यात आली आहे.
क.ब.चौ. उमवीतर्फे मु.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडांगणारील सामन्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने कृषी विद्यापीठ नवसारी, सुरत. विद्यापीठावर 120 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात 35 धावा आणि 04 गडी बाद करणारा आय एम आर नीरज जोशी हा सामनाविर ठरला. तसेच दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही क ब चौ उ म विं संघाने उत्कृष्ट खेळ करत विजय संपादन केला. त्या सामन्यातही निरज उत्कृष्ट कामगिरी केली. हा सामना बी के एन एम विद्यापीठ जुनागड गुजरात या संघासोबत होता त्यात नीरजने नाबाद 70 धावा आणि 01 गडी बाद केला.
नीरज जोशीच्या या यशाबद्दल आय एम आर चे संचालक प्रा.डॉ. बी व्ही पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अकॅडमीक डीन डॉ. तनुजा फेगडे, डॉ. ममता दहाड, डॉ. अनुपमा चौधरी तसेच शारीरिक संचालिक डॉ. नीलिमा पाटील उपस्थित होत्या.