मुंबई-जागतिक व्यापारातील कमजोरीचा परिणाम शेअर मार्केटमध्ये होत आहे. सेन्सेक्स २६५ अंकांनी खाली आल्याने ३४ हजारावर आले आहे. निफ्टीत देखील घसरण झाली असून १० हजार २०० वर येऊन पोहोचले आहे.
आयटी, तेल आणि गॅस काउंटर क्षेत्र वगळता बँकिंग, वित्त आणि हेल्थकेअर शेअर कमजोर असल्याचे दिसून आले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण देखील थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल ७३.१५ असे रुपयाचे मूल्य होते आज ७३.३० वर पोहोचला आहे.