सेन्सेक्स व निफ्टीने पार केला ऐतिहासिक टप्पा

0

नवी दिल्ली- जुलै फ्यूचर एंड ऑप्शंस (F&O) कॉन्ट्रैक्ट्सची मुदत संपण्यावर असतांना घरगूती शेयर बाजारची सुरुवात रिकॉर्ड स्तरवर झाली. कामकाजाच्या सुरुवातीला पीएसयू बँक, ऑटो, एफएमसीजीचे शेअर चांगल्या तेजीत होते. त्यामुळे सेंसेक्सने इतिहासात पहिल्यांदा 37,000 चा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीने सुद्धा नवीन इतिहासाची नोंद केली आहे. निफ्टीने 11,172.20 चा टप्पा पार केला आहे.

लागोपाठ चौथ्या दिवशी सेंसेक्स नवीन उंचीवर पोहोचले आहे. विक्रमाच्या लाटेवरील सेन्सेक्सची आगेकूच गुरुवारीही सुरुच असून गुरुवारी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ३७ हजारांचा पल्ला गाठला. तर निफ्टीनेही पहिल्यांदाच ११, १७१ पर्यंत ऐतिहासिक झेप घेतली.

चार दिवसातील सेन्सेक्स
25 जुलै सेंसेक्स 36947.18
24 जुलै सेंसेक्स रिकॉर्ड 36902.06
23 जुलै सेक्स 36749.69 चा नवीन रिकॉर्ड