मुंबई-मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतली आहे. शेअर बाजारामध्ये बुधवारी पाहायला मिळालेली विक्रमी तेजी आज देखील कायम आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू होताच इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर पोहोचला आहे. निफ्टीनेही पहिल्यांदाच ११४९५ ची पातळी गाठली. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. सकाळच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बॅंकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली आहे. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.