मुंबई – जागतिक बाजारातील निराशाजनक वातावरणातही आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगल्या निर्देशांकाने झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स आज ३८,१६१.८५ अंकांनी सुरू झाला. बुधवारी ३८,०१८.३१ अंकांवर सेन्सेक्स बंद झाला होता.
सुरुवातीच्या काही मिनिटांतच ७७.६९ अंकांची उसळी घेत सेन्सेक्स ३८, ०९६ वर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीतही २२.६५ अंकांची वाढ होऊन तो ११,४९९.६० अंकांवर पोहोचला.
आज सकाळी आशियाई निर्देशांकांमध्ये मिश्र कल बघायला मिळाले. जपानचा निक्की ०.४२ टक्क्यांनी पडून २२५ अंकांसह लाल भागात पोहोचला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.०२ अंकांनी पिछाडीवर होता तर चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.२१ अंकांनी वधारुन हिरव्या भागात होता.