सेंसेक्स, निफ्टीत वाढ; ऑटो क्षेत्रातील शेअर वधारले

0

नवी दिल्ली- अमेरिका चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांवर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदार सतर्क होऊन गुंतवणूक करत आहे. रिलायंस इंडस्ट्रीज, एचयूएल, एचडीएफसी, एसबीआई, इंफोसिस, एचडीएफसी बँक आणि वेदांतावर मोठ्या प्रमाणात मंदी सुरु आहे. तर ऑटो क्षेत्रातील शेअर वधारले आहे. सेंसेक्स आणि निफ्टीतही वाढ झाली आहे. सेंसेक्स २५ अंकांनी वाढले आहे. निफ्टी १०८०० अंकावर पोहोचले आहे.

शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मिडकैप आणि स्मॉलकैपच्या शेअरमध्ये तेजी होती. बीएसईचा मिडकैप इंडेक्स ०.४६ टक्क्याने वाढले आहे तर निफ्टी मिडकैप १०० इंडेक्स ०.१६ टक्केने वाढले आहे. परंतु बीएसईचा स्मॉलकैप इंडेक्स ०.०५ टक्क्याने खाली आले आहे.