नवी दिल्ली-आज सुरुवातीपासूनच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सकाळी तेजीत सुरुवात झाली मात्र त्यानंतर घसरणास सुरुवात झाली आहे. एचडीएफसी बँक, टीसीएस, एचयूएल, ओएनजीसी, एचडीएफसी, आईटीसी आणि मारुती कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने सेंसेक्समध्ये घसरण झाली. सोबतच निफ्टी १० हजार ७०० च्या जवळ पोहोचले आहे. ३७८ अंकांनी घसरला आहे. निफ्टी ८० अंकांनी कमी झाले आहे. एनएसईवर सर्व सेक्टोरल इंडेक्स पडले आहे. बैंकिंग, रियल्टी आणि एफएमसीजीचे शेअर खाली आले.
बँक निफ्टी ०.२२ टक्यांनी खाली येऊन २६,६३२.९५ वर कामकाज सुरु आहे. तर निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये ०.७७ टक्के आणि फाइनेंशियल सर्विसेजमध्ये ०.२६ टक्के कपात झाली आहे.