मुंबई: देशात आर्थिक मंदी जाणवत असल्याचा परिणाम शेअर मार्केटवर होत आहे. दोन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये आज पडझड दिसून आली. सेन्सेक्स ४२२.६८ अंकांनी कोसळल्याने ३७,०२९ वर येऊन ठेपले आहे. आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून अनेक उद्योग बंद पडत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसतो आहे.