मुंबई : पाच राज्यातील निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यापासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून सेन्सेक्स ५००-६०० अंकांनी कोसळले होते. दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेवर काल अर्थतज्ञ शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तीकांत दास यांनी पदभार स्वीकारताच शेअर मार्केटमध्ये तेजी आली असून आज सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढले आहे.