नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यादिवसी भारतीय शेअर बाजारमध्ये ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. इतिहासात कधी नाही एवढ्या ४० हजारवर सेंसेक्स पोहोचले होते. दरम्यान आज देखील सेंसेक्समध्ये २४०.१७ अंकानी वाढ होऊन सेंसेक्स ३९ हजार ४४२.७७ अंकावर पोहोचले आहे. देशात स्थिर सरकार येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढली आहे.