भुसावळ उपविभागीय पोलीस स्टेशनला सात ई- बाईक वितरण सोहळा संपन्न !
महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्याला प्रथम वाटप
भुसावळ प्रतिनिधी l
महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्यात प्रथमच उपविभागातील पोलीस स्टेशनला आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २००२२-२३) अंतर्गत सात ई – बाईक वितरण आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपविभागात बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, नशिराबाद पोलीस स्टेशन असे चार पोलीस स्टेशनचा समावेश आहे. चारही पोलीस स्टेशनची हद्द मोठी असल्याने रात्रीची गस्त करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडे पुरेसे वाहने नसल्याने बऱ्याच
भागांमध्ये चोरी,दरोडे,घरफोडी, खून असे गुन्हाचे प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ही संकल्पना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे मांडली व त्यांनी तत्काळ पोलीस अधिक्षक एम. राजकुमार जळगांव यांच्याकडे वर्ग केली.
पोलीस विभागाला तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम ( सन २००२२-२३) अंतर्गत सात ई – बाईक दिलेल्या आहे. पोलिसांना सुविधा मिळावी. तपास यंत्रणा लवकर कार्यत्वीत व्हावी. पेट्रोलचा येणार खर्च कमी व्हावा. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने सुरुवात करण्यात आली आहे. याचा निकाल मिळाल्यानंतर महाराष्ट्राने याचे • अनुकरण केल्यास महाराष्ट्रातील पोलीसांचा जो पेट्रोलचा खर्च आहे तो कमी होईल.
गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा.
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे हे गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील पोलीस स्टेशनला ई-बाईक वितरणासाठी फिरत होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शनिवार (ता. ६) सात ई – बाईक वितरण करण्यात आल्या.
रोजी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २००२२-२३) अंतर्गत
भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाचे प्रमाण दिवसेन – दिवस वाढतांना दिसत आहे. सर्रास पणे अवैध धंदे, सट्टा – पत्ते, अंमली पदार्थ विक्री, विमल गुटखा वाहतूक होऊनही पोलीस प्रशासन मूग गिळत गप्पा बसून आहे. भरदिवसाही घरफोडी होत आहे. चोरीचे प्रमाण वाढत आहे. पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याने गुन्हे वाढत आहे.यासर्व गोष्टींना अंकुश लावण्यासाठी तसेच रात्रीची गस्त वाढवण्यास ई- बाईक ही महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे उपविभागातील गुन्ह्याचे प्रमाण नक्की कमी होणार अशी माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, पोलीस अधिक्षक
एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, राहुल गायकवाड, गजानन पडघन अशांची उपस्थिती होती.