नेरी येथे भीषण पाणी टंचाई; पदरमोड करून वराडे भागवत आहे गावाची तहान

जामनेर l तालुक्यातील नेरी गावात पाण्याची भीषण टंचाई आहे 20 ते 25 दिवसांनी गावात पाणी मिळत आहे. अशा स्थितीत प्रगतिशील शेतकरी प्रकाश वराडे हे स्व खर्चाने गावात पाणी उपलब्ध करून देत आहेत.

गावात नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांची पाण्याची योजना पूर्ण होऊन कार्यरत होण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिकाचा काळ लागू शकतो .एप्रिल महिन्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावात विहिरी कमी असून त्यानाही पाणी कमी आहे . उन्हाची तीव्रता आणि त्यात पाण्याची कमतरता असे संकट नेरीकरांवर आहे. प्रगतिशील शेतकरी प्रकाश वराडे यांनी स्व खर्चाने टँकर द्वारे गावात पाणी पुरवठ्या साठी प्रयत्न केले असून आता पर्यंत 30 पेक्षा अधिक खेप टँकर ने पाणी पुरवठा झाला आहे.

प्रशासकीय यंत्रणा जागरुत होऊन त्यांनी त्वरित व्यवस्था करावी अन्यथा मे महिन्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल अशी चर्चा होत आहे.