मुंबई: बॉलिवूड किंग शाहरुख खानने आपल्या सिनेसृष्टीमध्ये २७ वर्षांची यशस्वी कारकिर्द पूर्ण केली आहे. त्या बद्दल शाहरुख ने आपला एक व्हिडिओ ट्विटरवर चाहत्यांना शेअर केला असून, त्यावर चाहत्यांनीही शाहरुखला भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याने टाकलेल्या व्हिडिओत शाहरुख बाइक चालवतांना दिसत आहे. शाहरुखने टाकलेल्या व्हिडिओत बाइक चालवताना हेल्मेट न घातल्याने सचिन तेंडूलकरने त्याला हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला होता. त्या ट्वीटला शाहरुखने प्रत्युत्तर दिले आहे.
शाहरुख ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या मित्रा, हेल्मेट परिधान करुन, ऑन ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्ह मारणे, तुमच्यापेक्षा कोण शिकवू शकते. मी माझ्या नातवांनाही सांगेन की, मला गाडी शिकण्याचे धडे खुद्द महान सचिन तेंडूलकरने दिले आहेत. आपण लवकरच मच्छी करी खाण्यासाठी भेटू. धन्यवाद’.
शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याने हेल्मेट परिधान न केल्याने सचिनने त्याला बाजीगर संबोधले होते. सचिनने म्हटले होते, ‘प्रिय बाजीगर, हेल्मेट परिधान करायचे विसरू नको, जोपर्यंत आयुष्य असेल, तोपर्यंत हेल्मेट परिधान करायला विसरु नको. सिनेसृष्टीत २७ वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. लवकरच भेटू.’