शाहरूख खानने मुलासाठी समीर वानखेडेंसमोर गयावया केली, याचिकेतून आलं समोर

मुंबई : समीर वानखेडे यांच्या याचिकेत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरूखने समीर वानखेडे यांना मेसेज केले होते. शाहरूख आणि समीर वानखेडे यांच्यातीस संभाषणाचे स्क्रिनशॉट समोर आले आहेत. शाहरूखने मुलासाठी वानखेडेंसमोर गयावया केलं असल्याचं समोर आलं आहे.

शाहरूखने नेमकं काय म्हटलं?

माझा मुलगा या घटनेतून खूप काही शिकेल, त्याला आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट ठरेल, असाही मेसेज शाहरूख खानने वानखेडे यांना केला होता. माझ्या मुलाला लवकरात लवकर घरी येऊद्यात. मी बाप म्हणून ही विनंती करतोय. या देशासाठी आपण खूप काही केलं. तरूण आणि प्रमाणिक तरूणांची देशाला गरज आहे. तुम्ही आणि मी माझ्या परीने केले. पुढच्या पिढीनेही ते करायला हवं. हे आपल्या हातात आहे की त्यांच्याकडून ते कसं करून घ्यायचं. या सगळ्या घटनेत मी काहीही बोललो नाही. मी कुठलही स्टेटमेंट केलं नाही. ना मी माध्यमात कुठे व्यक्त झालो. माझा फक्त तुमच्यातल्या चांगल्या व्यक्तिमत्वावर विश्वास आहे. मला बाप म्हणून मोडायला लावू नका एवढीच मी विनंती करेन.

माझ्या मुलाच्या बाबतीत थोडी संवेदना दाखवा, मी बाप म्हणून एवढीच विनंती करू शकतो. आम्ही सहज साधी राहणारी माणसं आहोत. माझा मुलगा थोडासा चुकला असेल, पण सराईत गुन्हेगारासारखं त्याला तुरूंगात टाकणं योग्य होणार नाही. त्याला तुरूंगात जास्त वेळ राहू देऊ नका. हॉलिडे सुरू झाल्यानंतर तो तिथेच अडकेल, ज्यात काहीही करता येणार नाही. काही खराब माणसांमुळे त्याचं आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या, असं शाहरूख म्हणाला.

समीर वानखेडे म्हणाले की, आर्यनला तुरूगांत टाकून कोणालाही आनंद होत नाहीये, पण कायद्यात काही गोष्टींची तरतूद आहे. त्याच मी पालन करतोय. मी माझं कर्तव्य बजावत आहे. पण आर्यनच्या बाबतीत काहीही चुकीचं होणार नाही याची मी हमी देतोय, असं समीर वानखेडे यांनी शाहरूखला मॅसेजमधून म्हटलं आहे.