सर्वोत्तम कामगिरीत शहादा आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान
शहादा – सर्वोत्तम कामगिरीत शहादा आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
राज्यातील एस.टी. च्या २५० आगारात शहादा आगाराने सर्वोत्तम कामगिरी केल्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यानिमित्ताने शहादा तालुका प्रवासी महासंघ व शहादा तालुका ग्राहक पंचायत तर्फे शहादा आगाराचे तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव श्रीकांत पाठक, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुनील सोमवंशी, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष उदय निकुंभ यांचे हस्ते नुतन आगार प्रमुख हरिष भोई, तत्कालिन स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी के.के.सोनार, प्रा.जीवन जगदाळे, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, विसपुते गुरुजी, अजबसिंग गिरासे, दिलीप खेडकर आदी उपस्थित होते. एस.टी. चालक- वाहक व कर्मचाऱ्यांचाही यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अजबसिंग गिरासे यांनी केले. संजय कुलकर्णी, श्रीकांत पाठक व प्रा. जीवन जगदाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आगारातील चालक- वाहक व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- आगार प्रमुख हरिष भोई यांच्या सत्कार करतांना श्रीकांत पाठक, सुनील सोमवंशी व उदय निकुंभ