शहादा कडकडीत बंद

शहादा – मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान वाचक वक्तव्य व त्रिपुरा मध्ये
अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार केल्याचे निषेधार्थ शहरातील सर्वच मुस्लिम समाजाने शांतता राखत
स्वयंस्फूर्तीने कडकडीत व्यवसाय बंद ठेवून पाळला आहे.

शहादा इस्लामीक मुस्लिम समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. मुस्लिम
समाजाच्या पैगंबर सल्लाल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दल वसीम रिजवी यांनी अपमानास्पद शब्द बोलले
तसेच त्रिपुरा या राज्यात मुस्लिम समाजावर अत्याचार, धार्मिक स्थळाची मोडतोड केल्याचा निषेधार्थ आज
शुक्रवारी ठेला व्यवसाय, कापडाचे व्यवसाय, फळ-पालेभाज्या, किराणा, वैद्यकीय सेवा, प्रेटोल पंप, मांस विक्री
सह सर्वच व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहभाग नोंदविला आहे. चोवीस तास वर्दळीच्या भाग गरीब नवाज
काँलनी, खेतिया रस्ता, बागवान गल्ली, यासह सर्वच भागात दिवसभर शुकशुकाट होता.