मुंबई-धुम फ्रेंचायझी पुन्हा एक ब्लॉकबस्टर ‘धूम-४’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘किंग खान’ शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांनी याची उत्सुकता लागली आहे. त्याआधी धूम-३ मध्ये अमीर खानने मुख्य भूमिका साकारत धूम केली होती.
सध्या शाहरुख खान अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करीत आहे. त्याच्या शुटिंगमध्ये किंग खान व्यस्त आहे. या चित्रपटाची शुटिंग संपल्यानंतर ते धूम-४ चा विचार करणार आहे.