शाहरूख, सलमान एका पडद्यावर; शाहरूखच्या ‘झिरो’चा टीजर रिलीज

0

मुंबई-बॉलिवूडमध्ये खान नावाच्या व्यक्तींचा फार मोठा दबदबा आहे. त्यात शाहरूख आणि सलमानमधील वाद सर्वश्रुत आहे. या दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची कल्पनाही केली नसेल. परंतु, ईदच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी आपल्या चाहत्यांना ईदच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘झिरो’चा नवा टीजर रिलीज झालाय ज्यात शाहरूख – सलमान थिरकताना दिसत आहेत.

शाहरूखचा  डायलॉग सलमानच्या तोंडी

झिरोच्या टीझरमध्ये चित्रपटाची कथा जरी फारशी लक्षात येत नसली. तरी शाहरूख आणि सलमानच्या डान्सचे कौतुक केले जात आहे. या दोन्ही कलाकारांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. ‘हम जिसके पीछे लग जाते हैं, उसकी लाइफ बना देते हैं’ हा चित्रपटात शाहरूखच्या तोंडी असलेला डायलॉग यावेळी मात्र सलमानच्या तोंडी दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय दाखवले जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे.