तालुक्यातील तरडी जवळ गुजरात राज्य परिवहन मंडळच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुकाचीवरील तरडी येथील दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली आहे.या अपघातात भागवत कालिदास पाटील वय 45 व विलास मंगल पाटील 40 रा.तरडी ता.शिरपूर असे मयत झालेल्याची नावे आहेत.अपघातानंतर तरडी परिसर शोककळा पसरली असून अपघातप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
तालुक्यातील तरडी येथील भागवत पाटील व विलास पाटील हे दोघे १० जून रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान एमएच- १८बीएफ- १८८७ क्रमांकाच्या दुचाकीने बभळाजकडून तरडी गावाकडे जात असतांना बभळाज ते तरडी गावादरम्यान चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परिवहन मंडळच्या बस ने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बभळाज व तरडी येथील ग्रामस्थांनी व थाळनेर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले तर वाहतूक सुरळीत केली.रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले.याप्रकरणी रात्री उशिरा थाळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही थाळनेर पोलीस करीत आहेत.