पुणे :- पुण्याच्या शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होण्यापासून वाचला आणि मोठा अनर्थ टळला. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईने अवघ्या पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. दैवाने या आगीच्या घटनेने मंदिराची कोणतीही हानी झाली नाही.
शनिवारपेठेतील ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन मंदिर असून त्याला ऐतिहासिक महत्व आहे. मंदिरातील एका खोलीत गॅस सिलिंडरने पेट घेत असल्याचे समजताच स्थानिकांनी तातडीने अग्निशामक दलाला कळविले. माहिती मिळताच कसबा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी पाण्याचा मारा करीत अवघ्या पाच मिनिटांत आग आटोक्यात आणली. दरम्यान, वेळीच आग आटोक्यात आल्याने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तर गॅस शेगडी पेटवताना गॅस गळती होऊन सिलिंडरने पेट घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.कामगिरीमधे कसबा अग्निशमन केंद्राचे वाहनचालक चंद्रकात जगताप, जवान अनिल करडे, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, विठ्ठल आढारी यांनी सहभाग घेतला.